पुण्यातील रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांना काल सांगलीमध्ये प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 25 हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कृतज्ञता पुरस्कार बुधाजीराव मुळीक यांना देण्यात आला असून तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं.
Site Admin | March 10, 2025 9:19 AM | Tara Bhavalkar
प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान
