तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिक इथे राहणाऱ्या एका नागरिकाने या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं ३० ते ४० वर्षं जुनी असून नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात. त्यामुळे साधुग्रामच्या निर्मितीसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून येत्या १४ जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.