November 3, 2025 8:28 PM

printer

टांझानियाच्या अध्यक्षपदी सामिया सुलुहू हसन पुन्हा विराजमान

हिंसक निदर्शनं आणि विरोधकांचा बहिष्कार या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीनंतर, टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांनी राजधानी डोडोमा इथल्या लष्करी परेड मैदानावर आज कडक सुरक्षेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. आपल्या विजयी भाषणात सामिया म्हणाल्या की, मतदान मुक्त आणि लोकशाहीवादी होतं. त्यांनी निदर्शकांना देशद्रोही म्हटलं. सामिया यांना ९८ टक्के मतांसह विजयी घोषित करण्यात आलं. दरम्यान, आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल आणि हिंसाचाराच्या वृत्तांवर चिंता व्यक्त केली आहे. ज्यामुळे शेकडो लोक मारले गेले आणि जखमी झाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.