तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज चेन्नईमध्ये अण्णा द्रमुक पक्षाचे महासचिव आणि विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या मित्र पक्षांशी आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी गोयल चेन्नई दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या तामिळनाडूमध्ये जाहीर सभा होणार असून ही सभा राज्याचं राजकीय चित्र बदलून टाकेल, असा विश्वास पळणीसामी यांनी व्यक्त केला. स्टालिन यांच्या सनातन विरोधातल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि यासंदर्भात स्टालिन यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली.