January 20, 2026 8:30 PM

printer

तमिळनाडू विधीमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण न वाचताच राज्यपाल परतले

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी आज अभिभाषण न वाचताच विधानसभेतून बाहेर पडले. छापील भाषण वाचण्याचा आग्रह विधानसभा अध्यक्ष एम. अप्पावु यांनी केल्यामुळं राज्यपाल भाषण पूर्ण न वाचताच बाहेर पडले. २०२३ पासून सलग चौथ्यांदा त्यांनी अभिभाषणाचं वाचन केलेलं नाही.

 

राज्यपाल निघून गेल्यावर विधानसभा अध्यक्षांनी भाषण वाचून दाखवलं, त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या AIADMK आणि PMK यांनी सभात्याग केला. विकसित भारत जी रामजी कायदा मागे घेऊन मनरेगा पुन्हा लागू करण्याचा उल्लेख या भाषणात होता. 

 

अभिभाषण सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत वाजवलं जावं असा राज्यपालांचा आग्रह होता. तर प्रथेप्रमाणे अभिभाषणाच्या आधी राज्य गीत आणि भाषण संपल्यावर राष्ट्रगीत यावर सरकार ठाम होतं. सभागृहात राष्ट्रगीताचा अपमान झाला, राज्यपालांचा माइक बंद करण्यात आला आणि लोकांच्या अनेक समस्यांकडे या भाषणात सरकारनं दुर्लक्ष केल्याचं निवेदन तमिळनाडूच्या लोकभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलं. सरकारनं हे सर्व मुद्दे फेटाळून लावले आहेत. समविचारी पक्षांच्या मदतीने घटनादुरुस्ती करुन राज्यपालांच्या अभिभाषणाची ही पद्धत बंद करण्याची मागणी संसदेत करणार असल्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.