डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 18, 2024 7:14 PM | Nana Patole

printer

राहुल गांधींची हत्या करण्याच्या, त्यांना इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – नाना पटोले

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना इजा पोहचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत दिली. 

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, पण अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. म्हणून हे आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.   

राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी दिल्याबद्दल भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचं काँग्रेसच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.