ताकाइची सानी यांची जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून निवड

जपानच्या संसदेने ताकाइची सानी यांना जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून निवडून दिलं आहे. जपानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ताकाईची यांना १२५ मतं मिळाली तर कनिष्ठ सभागृहात त्यांना २३७ मतं मिळाली होती. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या असलेल्या ताकाइची या जपान इनोव्हेशन पार्टीबरोबर एक नवीन युती सरकार स्थापन करणार आहेत. आज संध्याकाळी त्या पदभार स्वीकारतील. 

 

ताकाईची यांची जपानच्या प्रधानमंत्री पदावर निवड झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारत जपान दरम्यान धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आपण ताकाइची यांच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.