December 20, 2025 1:13 PM | Taiwan Crime

printer

Taiwan: माथेफिरूनं केलेल्या चाकू हल्ल्यात तीघांचा मृत्यू, ९ जण जखमी

तैवानची राजधानी तैपेई इथं एका माथेफिरूनं केलेल्या चाकू हल्ल्यात किमान ३ जणांचा मृत्यू झाला असून इतर ९ जण जखमी झाले आहेत. तैपेई इथं मुख्य मेट्रो स्थानकात या २७ वर्षीय संशयित व्यक्तीने धुराची नळकांडी पेरली होती आणि तिथून दुसऱ्या स्थानकाच्या दिशेने धावत असताना त्याने वाटेत येणाऱ्या प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याचं तैवानचे पंतप्रधान च्यो जुंग ताई यांनी सांगितलं. या संशयिताचा नंतर पळण्याच्या प्रयत्नात उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाल्यानं या हल्ल्यामागचा हेतू स्पष्ट न झाल्याची माहिती ताई यांनी दिली.