२६-११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याला १८ दिवसांची पोलिस कोठडी पटियाला हाऊन न्यायालयाने दिली आहे. तहव्वूर राणाचं काल भारताकडे प्रत्यार्पण झालं.
राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक काल संध्याकाळी विशेष विमानानं त्याला घेऊन नवी दिल्लीत पोहोचलं. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं. तहव्वूर राणा याला मुंबई हल्ल्याप्रकरणी २००९मध्ये अमेरिकेत अटक झाली होती. या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा ठपका त्याच्यावर आहे.
राणाचं प्रत्यार्पण हे केंद्र सरकारच्या राजनैतिक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमित शहा म्हणाले.