मुंबई २६/११च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला कोणत्याही प्रकारे सहभाग असल्याचं आरोपी तहव्वूर राणाने नाकारलं आहे. पाकिस्तान लष्कराच्या वैद्यकीय पथकात असलेल्या राणाने लष्कर-ए-तय्यबाच्या वतीने हल्ल्याच्या जागांची रेकी केल्याची माहिती या घटनेतला एक आरोपी डेव्हिड हेडली याने आधी दिली होती.
राणाचे अमेरिकेतून हस्तांतरण झाल्यानंतर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा संस्था त्याची कसून चौकशी करत आहे. ही चौकशी म्हणजे हल्ल्यापूर्वी लष्कर-ए तय्यबा आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने ही योजना आखताना केलेल्या कामाच्या चौकशाचा एक भाग आहे.