August 14, 2024 7:16 PM August 14, 2024 7:16 PM

views 11

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यानं सामाजिक तसंच आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातलं केवळ आघाडीचंच राज्य नसून ते प्रगती आणि नवनिर्मितीचं प्रतीकही आहे, असं राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. समृद्ध आणि सर्वसमावेशक विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला आहे.