June 26, 2024 3:49 PM June 26, 2024 3:49 PM
20
नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे एका रुग्णाचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजाराने चालू महिन्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात १० लोक दगावले. काल आणखी ६ जणांना स्वाईन फ्ल्यू ची लागण झाल्याचं आढळून आलं असून यामुळे लागण झालेल्यांची संख्या ३५ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात कोथरूड मधल्या एरंडवणे भागात दोन जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं आढळलं.