January 16, 2025 9:31 AM January 16, 2025 9:31 AM
10
महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या ‘अटल’ या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या 'अटल' या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.