August 13, 2024 7:04 PM August 13, 2024 7:04 PM
7
राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार
राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून ही सरकार त्यावर अंतिम निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारत असल्याचं राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदनही सादर करण्यात आलं आहे.