April 17, 2025 3:38 PM April 17, 2025 3:38 PM

views 5

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरचा दौरा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने ते शहरात पोहोचतील, सिडको परिसरातल्या कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विशेष विमानाने लखनऊ कडे रवाना होणार आहेत.  

February 7, 2025 9:59 AM February 7, 2025 9:59 AM

views 12

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या नव्या संरक्षण सचिवांशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याबाबत साधला संवाद

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेचे नवे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याबाबत संवाद साधला. राजनाथ सिंह यांनी हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हेगसेथ यांचे त्यांनी अभिनंदन केलं. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण भागीदारी आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहमती व्यक्त केली. तंत्रज्ञान सहकार्य, संरक्षण औद्योगिक पुरवठा साखळींचे एकत्रीकरण, मालवाहतूक, माहितीचं आदानप्रदान आणि संयुक्त लष्करी सरा...

September 24, 2024 7:45 PM September 24, 2024 7:45 PM

views 18

४१व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय तटरक्षक दल ही देशाची पहिली संरक्षण फळी असून देशाच्या विशाल किनारपट्टीचं, तसंच विशेष आर्थिक प्रदेशाचं संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी तटरक्षक दल पार पाडतं, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली इथं केलं आहे. भारतीय तटरक्षक दल कमांडर्सच्या ४१व्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दहशतवाद, शस्त्रास्त्रं, अमली पदार्थ आणि मानवी तस्करीला आळा घालण्याचं कामही तटरक्षक दल करत असून अंतर्गत धोक्यांपासून देशाचं संरक्षण करण्यात तटरक्षक दलाचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्या...