April 17, 2025 10:48 AM April 17, 2025 10:48 AM

views 5

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार – मुख्यमंत्री

शेतीविषयक विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात वर्ष २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीनं झालेल्या भूसंपादनात जमिनीचा कमी मोबदला मिळालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली असून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ...

December 12, 2024 10:43 AM December 12, 2024 10:43 AM

views 10

नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारतर्फे निधी मंजूर

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या एक लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठवला होता, या नुकसानीपोटी २२१ कोटी ८१ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नांदेड जिल्ह्यातही सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ८१२ कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबी...