June 29, 2024 7:20 PM June 29, 2024 7:20 PM
15
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या ५ तारखेला आर्थिक मदतीचे पैसे खात्यात जमा करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, यासह विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. तसंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या खेळाडूंना अर्हतेनुसार शासकीय नोकरी मिळण्याच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आवश्यकतेनुसार निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान ह...