August 10, 2024 8:36 PM August 10, 2024 8:36 PM
10
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० आणि ९०च्या दशकात त्यांनी रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. प्रायोगिक रंगभूमीवरुन कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कदम यांनी टुरटूर या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केलं. विच्छा माझ...