June 18, 2024 7:47 PM June 18, 2024 7:47 PM

views 15

उज्वल निकम यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून राज्य सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची नाना पटोले यांची टीका

उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून राज्य सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.  भाजपाचं सरकार विद्यार्थी आणि तरुणांची परिक्षा पहात आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीकडे सरकार गांभिर्यानं पहात नाही, अशी टीका त्यांनी केली. सरकारने नीट परिक्षाच रद्द करावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात पावसाळा सुरु...