July 27, 2024 7:38 PM July 27, 2024 7:38 PM

views 15

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविलं जाणार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविलं जाणार असल्याची घोषणा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त डॉक्टर रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित एका सोहळ्यात सुधा मूर्ती यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.