October 10, 2024 10:58 AM October 10, 2024 10:58 AM

views 38

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच सध्या दिली जात असलेली दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मोर्बा इथं दिली.  

October 3, 2024 3:14 PM October 3, 2024 3:14 PM

views 18

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल असं म्हटलं आहे. राज्यातल्या २ कोटी महिलांना लाभ मिळालेली ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक योजना असल्याचंही पवार आपल्या संदेशात म्हणाले.

October 1, 2024 9:07 AM October 1, 2024 9:07 AM

views 14

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पवार यांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.

December 26, 2024 2:57 PM December 26, 2024 2:57 PM

views 12

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांचा आनंद सोहळा येत्या सात ऑक्टोबरला नांदेडमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

July 27, 2024 7:14 PM July 27, 2024 7:14 PM

views 10

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या खोट्या असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या खोट्या असून राजकीय हेतून प्रेरित असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही योजना सादर करण्यात आली आहे. वित्त आणि नियोजन विभाग तसंच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा करण्यात आल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. या योजनेत अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

July 16, 2024 12:46 PM July 16, 2024 12:46 PM

views 9

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास कार्यालयातल्या या योजनेच्या समन्वयक सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जाधव यांची ही पूर्ण मुलाखत प्रासंगिक या सदरात उद्या बुधवारी प्रसारित केली जाणार आहे.नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ...

July 13, 2024 12:16 PM July 13, 2024 12:16 PM

views 10

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणीचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश

'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेची विभागात पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गावडे केली.या योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात परवा ११ जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण ७५ हजार ७०२ महिलांनी तर परभणी जिल्ह्यात १९ हजार ५३० महिलांनी अर्ज भरले आहेत. जालना जिल्ह्यात 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण...

July 3, 2024 7:38 PM July 3, 2024 7:38 PM

views 15

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं देणं, अर्ज भरून देणं यासाठी महिलांची अडवणूक केली तर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसंच योजनेचं संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोड अधिकाऱ्याची नियुक्ती करण्य...

July 2, 2024 5:46 PM July 2, 2024 5:46 PM

views 9

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा  ६५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या लाभार्थ्यांना लगेच पैसे दिले जातील तर उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलै पासूनचे पैसे दिले जातील, असंही ते म्हणाले. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजुर झाला.

June 29, 2024 7:01 PM June 29, 2024 7:01 PM

views 12

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय हा विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. याप्रकरणी हक्कभंग दाखल करणार असल्याचं ते म्हणाले. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला.  अर्थसंकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया डावलून हा शासन निर्णय काढल्याचं वडेट्टीवार म्हणाले. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन चालकांना परवाने देताना होणाऱ्या घोटाळ्यांचा मुद्दाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी योग्य उपाययोजना करण्याची सूचना विधान...