January 15, 2025 3:35 PM January 15, 2025 3:35 PM

views 12

भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या शेवटच्या सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात पाच बाद ४३५ धावा केल्या

महिला क्रिकेटमधे राजकोट इथं भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं आज निर्धारित ५० षटकात पाच बाद ४३५ धावा केल्या आहेत. सलामीवीर प्रतिका रावळनं ठोकलेलं शतक आणि कर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारतानं धावांचा डोंगर उभा केला आहे. रावळनं १२९ चेंडूत १५४ अशी सुरेख खेळी केली तर मानधनानं केवळ ८० चेंडूत १३५ धावा केल्या. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं पहिले दोन सामने जिंकून या आधीच २- ० अशी आघाडी घ...

January 13, 2025 10:43 AM January 13, 2025 10:43 AM

views 21

महिला क्रिकेट्च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर 116 धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं झालेल्या मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल भारतानं आयर्लंडवर 116 धावांनी विजय मिळवला. आणि या तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 370 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं शतकी खेळी केली. हरलीन देओल, स्मृती मंधना, प्रतिका रावल यांनीही चमकदार खेळी करत भारताच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. 371 धावांचं हे मोठं लक्ष्य गाठताना आयर्लंडला 254 धावांच करता आल्या. या माल...

December 8, 2024 2:05 PM December 8, 2024 2:05 PM

views 13

ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर १२२ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रिलेयानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉर्जिया आणि एलिसे यांच्या शतकी खेळींच्या जोरावर निर्धारीत ५० षटकांत ८ बाद ३७१ धावा केल्या. विजयासाठी ३७२ धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४४ षटकं आणि ५ चेंडूंमध्ये २४९ धावा करू...

July 25, 2024 12:38 PM July 25, 2024 12:38 PM

views 7

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार आहे. दरम्यान, काल या स्पर्धेत झालेल्या श्रीलंका विरुद्ध थायलंड सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा विजय झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंडनं वीस षटकांत सात गडी गमावून ९३ धावा केल्या. हे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने अवघ्या ११ षटकांत पार करत थायलंडवर विजय मिळवला. उद्या श्रीलंकेचा सामना पाकिस्तानसोबत होईल. श्रीलंकेच्या दांबुला इथं हे दोन्ही सामने खेळवले जातील. 

July 24, 2024 2:58 PM July 24, 2024 2:58 PM

views 23

महिला आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

  महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं अ गटातल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ८२ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत १७८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत अवघ्या ९६ धावा करता आल्या. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं ४८ चेंडूत ८१ धावा केल्या. दयालन हेमलता हिनं शेफालीसह १२२ धावांची भागीदारी केली. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्मा हिनं तीन तर राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शेफाली वर्मा हिला ...

July 1, 2024 7:38 PM July 1, 2024 7:38 PM

views 14

महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दहा गडी राखून विजय

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं आज दहा गडी राखून विजय मिळवला. आज चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात आफ्रिकेनं सर्वबाद ३७३ धावा करून ३६ धावांची आघाडी घेतली होती. भारतानं हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केलं.  भारतानं पहिल्या डावात ६०३ धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ २६६ धावात आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने लॉरा वोलव...

July 1, 2024 1:14 PM July 1, 2024 1:14 PM

views 13

महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०५ धावांची आघाडी

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे १०५ धावांची आघाडी आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर संपुष्टात आला असून, त्यांना फॉलो ऑन मिळाला. स्नेहा राणा हिनं ८ बळी घेऊन इतिहास घडवला, तर दीप्ती शर्मानं २ खेळाडू बाद केले. कालचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद २३२ धावा झाल्या होत्या.

June 20, 2024 9:07 AM June 20, 2024 9:07 AM

views 28

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बेंगळुरू येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ४ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये काल बंगळुरु इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघानं प्रथम फलंदाजी करत ३२६ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ३२१ धावात सर्वबाद झाला. या विजयासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.