November 11, 2024 11:27 AM November 11, 2024 11:27 AM
9
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात सर्वत्र सुरळीतपणे पडली पार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी काल राज्यात सर्वत्र सुरळीतपणे पार पडली. राज्यातल्या 37 जिल्ह्यांमधील एक हजार तेवीस परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळेत ही परीक्षा झाली. एकंदर 3 लाख 29 हजार 346 परिक्षार्थी उपस्थित होते असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.