August 19, 2024 8:13 PM August 19, 2024 8:13 PM
8
मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर
मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार असून आज रात्री ते नवी दिल्लीत पोचणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री या नात्यानं त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत.