July 27, 2024 7:21 PM July 27, 2024 7:21 PM
6
गोंदिया जिल्ह्यात लोकसभेत जी चूक झाली ती विधानसभेत होऊ देऊ नका – प्रफुल्ल पटेल
लोकसभेत ज्या प्रकारे केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री झाले त्याच प्रकारे आगामी विधानसभेत राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते आज गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. गोंदिया जिल्ह्यात लोकसभेत जी चूक झाली ती विधानसभेत होऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.