September 27, 2024 1:29 PM September 27, 2024 1:29 PM

views 18

जपानचे नवे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा

जपानचे नवे प्रधानमंत्री म्हणून शिगेरू इशिबा हे निवडून आले आहेत. इशिबा यांनी २१५ मतं मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार साने ताकाईची यांचा पराभव केला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात जपानच्या संसदेची बैठक झाल्यानंतर इशिबा हे जपानचे प्रधानमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील.

September 24, 2024 8:18 PM September 24, 2024 8:18 PM

views 12

श्रीलंकेच्या प्रधानमंत्रीपदी हरिणी अमरसुर्या यांचा शपथविधी

श्रीलंकेचे नवीन प्रधानमंत्री म्हणून हरिणी अमरसुर्या यांनी आज शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पॉवरच्या खासदार असलेल्या अमरसुर्या यांनी आज राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासमोर शपथ घेतली. दिसानायके यांनी कालच राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. एनपीपीचे खासदार विजित हेरथ आणि लक्ष्मण निपुण अराची यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

July 21, 2024 8:18 PM July 21, 2024 8:18 PM

views 7

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये दोन तृतियांश मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सदनात हजर असलेल्या २६३ सदस्यांपैकी १८८ सदस्यांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. ७४ मतं विरोधात गेली, तर एका सदस्यानं तटस्थ भूमिका घेतली. ओली यांची १४ जुलै रोजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदावर नियुक्ती झाली होती

July 13, 2024 9:18 PM July 13, 2024 9:18 PM

views 12

महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र आणि फिन्टेक राजधानी बनवणं हे आपलं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्र हे समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या ...