July 8, 2024 4:48 PM July 8, 2024 4:48 PM

views 13

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल १४ जुलैपासून सुरू

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून म्हणजेच १४ जुलैपासून सुरू होणार आहे. सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची नियुक्ती आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून उद्घाटनाचं प्रतीक म्हणून या नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला रविवारी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देण्यात येणार आहे.