August 16, 2025 3:17 PM August 16, 2025 3:17 PM

views 15

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट

मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. मध्यरात्री सुमारे २ वाजता एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली.  आज सकाळी साडे ८ वाजता संपलेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेत २४४ मिलिमीटर तर कुलाब्यात ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये ऑगस्टमध्ये एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाचा हा गेल्या ५ वर्षातला विक्रम आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट २०२० रोजी २६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. विक्रोळी, सांताक्रूझ, सायन आणि जुहू या परिसरांमध्य...

April 5, 2025 3:40 PM April 5, 2025 3:40 PM

views 13

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. तसंच ९ एप्रिल पर्यंत कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

April 5, 2025 1:41 PM April 5, 2025 1:41 PM

views 15

देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा तर दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पुढचे चार ते पाच दिवस भारताच्या वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात ९ एप्रिल पर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या ९ तारखेपर्यंत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज ओडिशा, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटांवर मेघगर्जनेसह पाऊस तर केरळ, माहे, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत काल ...

April 1, 2025 9:41 AM April 1, 2025 9:41 AM

views 17

राज्याच्या काही भागात पुढील चार दिवस पावसाचा इशारा – हवामान विभाग

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

February 6, 2025 1:55 PM February 6, 2025 1:55 PM

views 3

अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढीलं दोन दिवस पडणार जोरदार पाऊस – हवामान विभाग

ईशान्य भारतात अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढले दोन दिवस जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्यप्रदेशात राजधानी भोपळसह इतर भागात थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे, तरी पुढले काही दिवस सकाळ आणि रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होईल असा अंदाज आहे. राजस्थानमध्ये गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे थंडीचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे. सीकर, चूरू, झुंझुनूं आणि नागौर इथं आज थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

December 3, 2024 2:33 PM December 3, 2024 2:33 PM

views 8

पुढच्या तीन दिवसात राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता – हवामान विभाग

फेंगल चक्रिवादळामुळे पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून वातावरण उष्ण आणि ढगाळ राहील अशी शक्यता आहे. या पावसामुळे काजू आणि आंबा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  

October 20, 2024 7:16 PM October 20, 2024 7:16 PM

views 5

राज्यात परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान

राज्यात परतीच्या पावसानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं आहे. अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबिनला त्याचा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणलं असलं तरी शेतात पडून असलेलं सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. य...

October 18, 2024 7:11 PM October 18, 2024 7:11 PM

views 9

परतीच्या पावसामुळे भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांचं नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भात आणि नाचणी पिकांचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, खेड, चिपळुण, गुहागर आणि दापोलीतही जोरदार पाूस सुरू आहे. या पावसामुळे ग्रामीण भागासोबत शहरी भागातही जनजीवन विस्कळीत झालं आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या संततधारेमुळे कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं असून सुमारे ५० हजार ...

October 5, 2024 9:08 PM October 5, 2024 9:08 PM

views 14

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यातून आज मान्सून परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उर्वरीत महाराष्ट्रातून पुढच्या आठवड्यात मान्सून पूर्णपणे माघारी जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

September 27, 2024 3:32 PM September 27, 2024 3:32 PM

views 9

पावसामुळे राज्यात गेल्या चोवीस तासात ३ जणांचा मृत्यू

 पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये राज्यात गेल्या चोवीस तासात ३ जण मरण पावले असून ६ जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध धरणात ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या कालावधीत हे प्रमाण सुमारे ७१ टक्के होतं.    मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट लागू असून विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज सकाळपर्यंत संपलेल्या चोवीस तासात मुंबईत ४३ मिलीमीटर तर उपनगरात ७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सखल भा...