August 27, 2024 8:35 PM August 27, 2024 8:35 PM
8
पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे. यासाठी आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान ब्लॉक नसेल. गोरेगाव-कांदिवली विभागातली गर्दी कमी करणं, उपनगरीय गाड्यांच्या वेळांमध्ये सुधारणा करणं आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी समर्पित लाइन्स तयार करण्यासाठी साडेचार किलोमीटरच्या सहाव्या मार्गाचं काम करण्यात येत असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलं. २८ ...