October 2, 2024 7:27 PM October 2, 2024 7:27 PM

views 5

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेतर्फे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर महानगरपालिकेमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला पुरवलं जातं. पेंच, कोराडी, खापरखेडा या प्रकल्पातल्या राखीव पाण्याचा वापर आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत असल्याची माहितीही गडकरी...