February 5, 2025 2:29 PM February 5, 2025 2:29 PM

views 19

प्रधानमंत्र्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचं केलं आवाहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदिप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर आणि हरदीप सिंह पुरी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनीही मतदान केलं. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार, प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा, दिल्ली पोलिस आयुक्त स...

February 3, 2025 1:35 PM February 3, 2025 1:35 PM

views 19

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार

दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी ७ पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी ४८ तास प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येणार नाहीत. या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी तसंच तमिळनाडू आणि उत्तरप्रदेशातल्या प्रत्येक...

January 22, 2025 10:55 AM January 22, 2025 10:55 AM

views 9

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री आज भाजपच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भाजपाच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी नमो अॅप्लिकेशनद्वारे संवाद साधणार आहेत. “मेरा बूथ सबसे मजबूत” हे या उपक्रमाचं घोषवाक्य आहे. या उपक्रमाअंतर्गत, दिल्लीतील 256 प्रभागांतील, 13 हजार 33 पक्षाचे खासदार, आमदार, मतदान केंद्रांवरील पक्ष कार्यकर्ते दृक-श्राव्य माध्यमातून प्रधानमंत्र्यांचा संदेश ऐकतील. त्यांपैकी काही कार्यकर्त्यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचं नमो अॅपचे राष्ट्रीय समन्वयक कुलजीत ...

January 15, 2025 2:24 PM January 15, 2025 2:24 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा करत आहेत प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे परवेश वर्मा आणि रोहिणी गुप्ता हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आपचे नेते मनिश सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव हेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.