June 20, 2024 1:24 PM June 20, 2024 1:24 PM

views 19

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांच्या संयुक्त संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांच्या संयुक्त संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ज्योती सुरेखा वेण्णम, परनित कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी यांच्या संघानं उपांत्यपूर्व सामन्यात टर्की संघाचा २३४ - २२७ अशा गुणफरकानं  पराभव केला. भारतीय संघाचा अंतिम सामना इस्टोनिया बरोबर या शनिवारी होणार आहे.