July 16, 2024 6:34 PM July 16, 2024 6:34 PM
11
नांदेड जिल्ह्यात जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामं जलद गतीनं करावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातल्या सर्वच जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामं जलद गतीनं करावीत, तसंच या योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मंत्रालयातल्या समिती कक्षात नियोजन विभाग, वित्त विभाग तसंच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या क्षारपड जमिनींच्या सुधारणेसंदर्भात...