November 14, 2024 1:17 PM November 14, 2024 1:17 PM

views 12

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. यामध्ये राजस्थानातले सात, पश्चिम बंगालमधले सहा, आसाममधले पाच, बिहारमधले चार, कर्नाटकातले तीन आणि मध्य प्रदेशातल्या दोन जागांचा समावेश आहे. याशिवाय केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालयमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी काल मतदान  झालं. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदान झालं.

July 16, 2024 7:47 PM July 16, 2024 7:47 PM

views 11

केरळमध्ये चित्तूर नदीत अडकलेल्या चार जणांची सुटका

केरळमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आज चित्तूर नदीत अडकलेल्या चार जणांची सुटका केली. पल्लकड जिल्ह्यात चित्तूर नदीत चार जण आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, तामिळनाडूच्या आलियार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे पाण्याची पातळी वाढून ते नदीतल्या खडकावर अडकले. अग्निशमन दलाने दोरी आणि जीवरक्षक जॅकेटच्या साहाय्यानं त्यांची सुखरूप सुटका केली.