October 21, 2024 8:40 AM October 21, 2024 8:40 AM

views 10

कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार

कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली.   शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल...