February 4, 2025 1:44 PM February 4, 2025 1:44 PM
3
कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन
कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलं. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं. याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बो...