July 23, 2024 8:14 PM July 23, 2024 8:14 PM
8
अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बदलत्या हवामानानुसार बियाणांच्या वाणाची निर्मिती करण्यासाठी सर्वसमावेशक कृषी संशोधन यंत्रणेचा पुनर्परीक्षण करण्यात येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडतानाच्या भाषणात सांगितलं. सरकार आणि तज्ञ यावर देखरेख करणार आहेत. तेलबिया, कडधान्यं या बाबतीत...