September 27, 2024 7:18 PM September 27, 2024 7:18 PM
3
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचं निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज पहाटे धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रोहिदास पाटील यांनी सन १९७२ मध्ये धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून येत राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये तत्कालीन कुसुंबा आणि आताच्या धुळे ग्रामीण विधान सभा मतदारसंघात आमदार म्हणून ते निवडून आले आणि त्यानंतर सलग ६ वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. १९८६ ते १९८८ या...