February 11, 2025 1:17 PM February 11, 2025 1:17 PM

views 5

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बोराडे यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बोराडे यांच्या जाण्यानं साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ तुटली असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. बोराडे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र विशेषतः साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

July 22, 2024 10:34 AM July 22, 2024 10:34 AM

views 12

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईसह कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातल्या अन्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन, पोलीस तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्व यंत्रणांनी हवामान खात्याकडून तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घ्यावी आणि त्यानुसार नियोजन करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. प...

July 16, 2024 7:16 PM July 16, 2024 7:16 PM

views 9

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उत्तररात्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री अडीचच्या सुमाराला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “समन्वय समिती” गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, तसंच सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून क...

July 14, 2024 3:23 PM July 14, 2024 3:23 PM

views 11

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधलं परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांचा विकास कसा साधता येईल याबाबत या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली.

July 11, 2024 3:14 PM July 11, 2024 3:14 PM

views 5

पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षितता यांच्याद्वारे शाश्वत विकास धोरणांसाठी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

पंधराव्या कृषी नेतृत्व समिती २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल नवी दिल्लीत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ लाख हेक्टरवर झाडं लावण्याच्या तसंच पाच टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय राज्यानं घेतल्याची माहिती दिली. पीक विमा योजनेत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं सांगत सिंचन प्रकल्पाद्वारे १७ लाख हेक्टर सिंचन क्षमतेचं...

July 8, 2024 6:53 PM July 8, 2024 6:53 PM

views 7

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने विविध पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आदी उपस्थित होते.  मुंबई आणि उपनगरात कालपासून आज सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिलीमिटर ...

July 8, 2024 6:16 PM July 8, 2024 6:16 PM

views 13

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

मुंबईत मद्यपान करून वाहन चालवण्याची प्रकरणं थांबवण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची ठिकाणी आणि नाक्यानाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणारे पब्ज आणि बारवरही कारवाया कराव्यात, अशी सूचना मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि सुट्टीच्या दिवशी तपासण्यांचं प्रमाण वाढवावं, मद्यपान करून वाहनं चालवणाऱ्या चालकांकडून दंड वसूल करण्यात यावा आणि वारंवार नियम मो...

July 8, 2024 5:47 PM July 8, 2024 5:47 PM

views 9

मुंबई महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईसह राज्यातली पावसाची स्थिती पाहता नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून सर्व यंत्रणा २४ तास दक्ष असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात  पाऊस झाल्यानं  त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेनं तयार केलेल्या साठण तलावामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भा...

July 2, 2024 5:27 PM July 2, 2024 5:27 PM

views 6

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत – मुख्यमंत्री

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा  ६५ वयापर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजूर झाला.

July 2, 2024 5:46 PM July 2, 2024 5:46 PM

views 9

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा  ६५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या लाभार्थ्यांना लगेच पैसे दिले जातील तर उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलै पासूनचे पैसे दिले जातील, असंही ते म्हणाले. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजुर झाला.