January 22, 2025 3:31 PM January 22, 2025 3:31 PM
4
ईपीएफओ ने नोव्हेंबर महिन्यात जोडले १४ लाख ६३ हजार नवीन सदस्य
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात १४ लाख ६३ हजार सदस्य जोडले गेले आहेत. ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत यात ९ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. रोजगारात वाढ आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढती जागरुकता यामुळेच सदस्य संख्या वाढल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं आहे. वेतनश्रेणी डेटानुसार या सदस्यांपैकी ४ लाख ८१ हजार सदस्य हे १८ ते २५ वर्षे वयोगटातील असून २ लाख ४० महिला आहेत.