July 24, 2024 7:48 PM July 24, 2024 7:48 PM

views 18

कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातल्या कुटुंबांसाठी अधिकच्या नोंदी मिळवण्याचा राज्यसरकारचा निर्णय

कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातल्या कुटुंबांसाठी अधिकच्या नोंदी मिळवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांचं एक पथक हैदराबादला पाठवल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी दिली.   मराठा समाज आरक्षणासंबंधी शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी शासनाने विहीत शुल्क भरून केली आहे, या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी प...

July 22, 2024 7:53 PM July 22, 2024 7:53 PM

views 11

मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.  २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर केलं नाही, त्यामुळे तो विफल ठरला, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली असून सर्वपक्षीय बैठकीत यासंदर्भ...

July 16, 2024 1:15 PM July 16, 2024 1:15 PM

views 11

मराठा-ओबीसी आरक्षणावरून तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याचं भुजबळांचं शरद पवारांना आवाहन

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात तयार झालेला तणाव निवळण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आपण त्यांना केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काल भेट घेतल्यानंतर भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते.   या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यामध्ये कोणतंही राजकारण न आणता येत्या दोन दिवसांत आपण या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, तसंच राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा क...

June 18, 2024 8:01 PM June 18, 2024 8:01 PM

views 17

जातनिहाय जनगणना करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

महायुती सरकारनं आरक्षणाबाबत दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली असून पुरोगामी महाराष्ट्राचं गतवैभव परत मिळवण्यासाठी आणि दोन्ही समाजांचं समाधान करण्यासाठी सरकारनं जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अशी मागणी करणारं एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे, असंही ते म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.  जरांगे पाटलांच्या आंदोलनप्रमाणेच ओबीसी आरक्षणासाठीच्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आपला  पाठिंबा आहे, असं त्यांनी सांगितलं.  नीट परीक्षेच्या ...