July 25, 2024 3:01 PM July 25, 2024 3:01 PM
6
अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी राऊज एव्हेन्यू न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तिहार कारागृहातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केजरीवाल यांनी सुनावणीला हजेरी लावली. सर्वोच्च न्यायालयानं १२ जुलै रोजी ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला होता. मात्र, याच प्रकरणात सीबीआयनं त्यांना अटक केल्यानं त्यांची रवानगी तिहार कारागृहात झाली होती.