December 3, 2024 9:04 AM December 3, 2024 9:04 AM

views 16

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार

आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारलं आहे, अशी माहिती, सरहद संस्थेचे संजय नहार, मसापचे मिलिंद जोशी आणि संयोजन समितीचे डॉ. सतिश देसाई यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. पुढच्या वर्षी 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन दिल्लीत होणार आहे.  

August 18, 2024 3:39 PM August 18, 2024 3:39 PM

views 10

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विख्यात मराठी साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या नावाने मराठी भाषेचं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात केलं.   दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीत ७० वर्षांनंतर अखिल भ...