August 19, 2024 1:13 PM August 19, 2024 1:13 PM

views 14

झिम्बावेचे उपाध्यक्ष कॉन्ट्याटिनो गुवेया यांचे १९ वी सीआयआय भारत अफ्रिका व्यापार परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन

१९ वी सीआयआय भारत अफ्रिका व्यापार परिषद उद्या नवी दिल्लीत होत असून या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी झिम्बावेचे उपाध्यक्ष कॉन्ट्याटिनो गुवेया यांचे आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्याच्या उपस्थितीमुळे भारत आणि झिम्बावे याच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याद्वारे भारत आणि अफ्रिकेतील  परस्पर सहकार्याची भावना अधिक मजबूत होईल असंही ते म्हणाले.

July 7, 2024 8:33 PM July 7, 2024 8:33 PM

views 15

झिम्बाव्वे विरोधातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा १०० धावांनी विजय

भारत आणि झिम्बाव्वे यांच्यात आज झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं १०० धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा यानं झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारतानं, झिम्बाव्वे समोर विजयासाठी २३५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र १९व्या षटकातच झिम्बाव्वेचा संपूर्ण संघ १३४ धावांत माघारी परतला. भारताच्या वतीनं मुकेश कुमार आणि आवेश खान यांनी प्रत्येकी ३ तर रवी बिष्णोई यानं २ गडी बाद केले.    पाच सामन्यांच्या मालिकेला तिसरा सामन...

July 2, 2024 1:21 PM July 2, 2024 1:21 PM

views 5

टी ट्वेंटी : भारताच्या पुरुष संघाची पाच सामन्यांची मालिका झिम्बाब्वे येथे रंगणार

भारताचा पुरुष क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान हरारे इथं ही मालिका होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतानं आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून शुभमन गिल याचं नेतृत्व करणार आहे. ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू या संघाचा भाग असतील. या दौऱ्यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून जातील, मात्र नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती श्रीलंकेसोबतच्या मालिकेवेळी केली जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचि...