August 6, 2024 3:57 PM August 6, 2024 3:57 PM

views 11

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्णांची संख्या ६६ वर

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या ६६वर पोहोचली आहे. यामध्ये २६ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांचं परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.  गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस, घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत आहे.

August 5, 2024 7:23 PM August 5, 2024 7:23 PM

views 9

पुण्यात झिका विषाणूचे आणखी ७ नवे रुग्ण

पुण्यात झिका विषाणूचे आणखी सात नवे रुग्ण आढळले आहेत. या सात नवीन रुग्णांमध्ये कात्रज आणि कोंढवा भागातल्या पाच गर्भवती महिला, एक १८ वर्षीय तरुण आणि एक ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७२ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागानं दिला आहे.  

July 21, 2024 7:55 PM July 21, 2024 7:55 PM

views 8

पुण्यात आणखी ४ रुग्णांना झिका विषाणूची लागण

पुण्यात आणखी ४ रुग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचं निदान झाल्यानं रुग्णांची एकूण संख्या आता ३२ वर पोहोचली आहे. हे रुग्ण पुण्याच्या येरवडा, वडगाव बुद्रुक, प्रभात मार्ग आणि विधी महाविद्यालय मार्ग या परिसरातले आहेत. यापैकी २३ रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरु आहेत तर ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यात संसर्गाचा उद्रेक झालेल्या भागात विविध प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

July 20, 2024 11:07 AM July 20, 2024 11:07 AM

views 16

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये एका गर्भवतीसह 2 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरातल्या झिकाच्या रुग्णांची संख्या आता 27 झाली असल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे. यामध्ये 11 गर्भवती आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरातल्या 2 गरोदर महिलांचा झिका विषाणूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या दोघींना कोणतीही लक्षणं नाहीत तसंच त्यांच्या गर्भाची प्रकृतीही चांगली आहे.   मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांपासून पुन्हा नव्यानं संपूर्ण शहराचं सर्वेक्षण सुरू क...

July 15, 2024 12:38 PM July 15, 2024 12:38 PM

views 6

पुण्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण

राज्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात आढळले आहेत.राज्यातील एकंदर २१ रूग्णांपैकी १९ रूग्ण पुण्यात, एक कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेरमध्ये आढळून आला आहे.   राज्यभरात आतापर्यंत २११ गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातल्या १० महिलांना झिकाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

July 7, 2024 6:04 PM July 7, 2024 6:04 PM

views 12

पुण्यात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण

पुणे शहरात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात राहणारी ४२ वर्षीय महिला आणि खराडीची रहिवासी असलेली २२ वर्षीय तरुणी यांना झिकाची लागण झाल्याचं आढळून आल्याने शहरातल्या झिका संसर्गबाधितांची संख्या १२वर गेली आहे.