July 26, 2025 1:48 PM July 26, 2025 1:48 PM

views 13

झारखंड: चकमकीत जनता जन मुक्ती पार्टी नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार

झारखंडच्या गुमला जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जनता जन मुक्ती पार्टी या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार झाले. या तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. तसंच या ठिकाणावरून एके-४७ आणि इनसास रायफल्सही जप्त केल्या.

July 4, 2025 2:40 PM July 4, 2025 2:40 PM

views 12

ईडीने झारखंडमध्ये हजारीबाग आणि रांचीमधल्या आठ ठिकाणांवर टाकले छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने आज झारखंडमध्ये हजारीबाग आणि रांचीमधल्या आठ ठिकाणांवर छापे टाकले. झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. खंडणी, बेकायदेशीर वाळू उत्खनन, जमीन हस्तांतरण अशा विविध प्रकारच्या आरोपांचा त्यात समावेश आहे.