April 24, 2025 3:40 PM April 24, 2025 3:40 PM
8
शून्य गोवर – रुबेला मोहिमेला आज सुरुवात
शून्य गोवर - रुबेला मोहिमेला आज नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान देशातले ३२२ जिल्हे गोवरमुक्त तर ४८७ जिल्हे रुबेलामुक्त करण्यात यश आल्याचं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ही केवळ मोहीम नसून देशातल्या कोट्यवधी बालकांचं आयुष्य अधिक गुणवत्तापूर्ण करण्याचा मार्ग आहे, असं नड्डा म्हणाले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी वार्ताहर परिषदा आणि जनसभा घेऊन लसीकरणाबाबत जनजागृती करावी असं आवाहनही त्यांनी केलं.