April 4, 2025 1:34 PM April 4, 2025 1:34 PM

views 4

यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य – संवैधानिक न्यायालयानं

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य असल्याचं देशाच्या संवैधानिक न्यायालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर प्रसारित निर्णयात न्यायालयाच्या ८ पैकी ६ न्यायाधिशांनी यून यांना पदावरून हटवण्याच्या बाजूनं कौल दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ६० दिवसांच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणं आवश्यक आहे. नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत प्रधानमंत्री हॉर्न डक सू काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहतील.

January 17, 2025 1:42 PM January 17, 2025 1:42 PM

views 2

यून सुक येओल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका सेऊल इथल्या न्यायालयाने फेटाळली आहे. येओल यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.   येओल यांना झालेली अटक अवैध असल्याचा तसंच या प्रकरणाचा तपास वेगळ्या संस्थांकडे सोपवला जावा असा दावा आज झालेल्या सुनावणीत करण्यात आला. मात्र, न्यायालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. तसंच, या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी कोरियाच्या भ्रष्टाचार अन्वेषण कार्यालयावर स...