October 12, 2024 8:55 PM October 12, 2024 8:55 PM

views 16

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर ९१ हजार आंतरवासिता संधी उपलब्ध

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत १९३ कंपन्यांनी ९१ हजार इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पोर्टल आजपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार २५ ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.   कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधीबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून यामध्ये तेल, वायू, उर्जा, पर्यटन यासारख्या विविध २४ क्षेत्रांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ या काळात २१ ते २४ वर्षे वयोगटातल्या सव्वा लाख जणांना आंतरवासिता संधी मिळवून द...