September 2, 2024 8:27 PM September 2, 2024 8:27 PM
84
पॅरिस पॅरालम्पिकमध्ये नितेश कुमारला सुवर्ण, तर योगेश कथुनिया याला रौप्य पदक
पॅरिस पॅरालिम्पिकचा आजचा पाचवा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला. बॅडमिंटनपटू नीतेश कुमार यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेल याचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि भारताची पदकसंख्या नऊवर नेली. तत्पूर्वी भालाफेकपटू योगेश कथुनिया यानं रौप्यपदक पटकावलं. त्यानं ४२ मीटर २२ सेटींमीटर अंतरावर भाला फेकला. बॅडमिंटनपटू तुलसीमती मृगेशन हिनं मनीषा रामदास हिच्यावर मात करत अंतिम फेरीत धडक मारून आणखी एक पदक निश्चित केलं. आता तिचा पुढचा सामना चीनच्या प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे. त...